मुंबई - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सावासाठी लगबग सुरु झाली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन सुरु झाले आहे. गेल्या आठवड्यात उमरखाडीचा राजा, काळाचौकीचा महागणपती, खेतवाडीचा विघ्नहर्ता, परळचा महाराजा, मलबारहिलचा राजा आदींचे आगमन झाल्यानंतर रविवारी फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, माझगावचा मोरया, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदननगरचा राजा आदी मंडळांच्या मंडपात ढोल, ताशांच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेशाचे आगमन झाले.
कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. कोरोना नियंत्रणात असल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. अनेक मंडळांनी महिनाभरापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. देखावे, सजावट, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईने मंडप सजले आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम आखले आहेत. मंडळे यासाठी कामाला लागली आहेत. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधीच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होते. गेल्या शनिवार, रविवारपासूनच गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईतील ३० हून अधिक मंडळांनी गणपती बाप्पाला मंडपात वाजत गाजत आणले. येत्या दोन तीन दिवसांत बहुतांश गणपतीचे आगमन होणार असून तशी तयारी मंडळांनी केली आहे. दरम्यान गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गणपती आगमन ते विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, चौपाट्यांवरील सुविधा आदी नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंडपात गणपतीचे आगमन -
- फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, माझगावचा मोरया, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदननगरचा राजा, डोंगरीचा राजा, परळचा विघ्नहर्ता, कुंभारवाड्याचा गणराज, अँण्टोपहिलचा महाराजा, कुलाब्याचा सम्राट, सुंदरबागचा राजा, मुलुंडचा विघ्नहर्ता आदी मंडळांच्या मंडपात रविवारी गणेशाचे आगमन झाले.
मंडपात गणपतीचे आगमन -
- फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, माझगावचा मोरया, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदननगरचा राजा, डोंगरीचा राजा, परळचा विघ्नहर्ता, कुंभारवाड्याचा गणराज, अँण्टोपहिलचा महाराजा, कुलाब्याचा सम्राट, सुंदरबागचा राजा, मुलुंडचा विघ्नहर्ता आदी मंडळांच्या मंडपात रविवारी गणेशाचे आगमन झाले.
No comments:
Post a Comment