मुंबई - अवघ्या सहा दिवसांवर गणेशोत्सव आला असताना आतापर्यंत अवघ्या दोन हजार मंडळांनाच मंडपाची परवानगी मिळाली आहे. पालिकेने दिलेली मुदत मंगळवारी, २३ ऑगस्टला संपली आहे. मात्र अजूनही बहुतांश मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे परवानगीसाठी आणखी चार दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. मात्र आता निर्बंध हटवल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. येत्या ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे. त्याआधी मंडपासाठी परवानगी घेणे मंडळांना आवश्यक आहे. मंगळवारपर्यंत ३२५५ मंडळांनी परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केले. यापैकी १९४७ मंडळांना परवानगी मिळाली आहे. तर २७३२ अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहे. अर्जासाठी २३ ऑगस्ट शेवटची मुदत होती. अजूनही अनेक मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याने पालिकेने मुदतीत चार दिवसांची वाढ करावी अशी मागणी केली आहे. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी परवानगीसाठीची प्रक्रिया सुरु ठेवली जाईल असे पालिकेने जाहिर केले होते. मात्र सुट्टीच्या दिवशी परवानगीसाठीची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसले नाही, याकडे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मंडपासाठी परवानगीसाठीची मुदत वाढवून मिळेल अशी अपेक्षा दहिबावकर यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment