शीव रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2022

शीव रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण



मुंबई - रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे निदान वेळच्यावेळी झाल्यास त्यावर अधिक परिणामकारक उपचार करणे शक्य होते. हीच बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या विविध रुग्णालयांमध्ये मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अंमलबजावणीलाही सुरुवात केली आहे. शीव रुग्णालयात पहिले ‘मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्रांचे मंगळवारी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कक्षाचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीदरम्यान नागरिकांच्या सेवेत कार्यरत असेल. तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत हा कक्ष सुरु असणार आहे. या कक्षामध्ये रक्तदाब व मधुमेह चाचण्या मोफत असणार आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये आदी ठिकाणी याप्रकारचे आणखी १५ कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

ब्रेल लिपीतील आरोग्य मार्गदर्शिका पुस्तकाचे प्रकाशन -
पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाद्वारे आरोग्य व आजारांबाबत जागृरकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आरोग्य मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन यापूर्वीच करण्यात आले होते. याच पुस्तकाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी द ब्लाईन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) चे अध्यक्ष अरुण भारस्कर हे उपस्थित होते. यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना भारस्कर यांनी आरोग्य मार्गदर्शिका यासारखे अत्यंत उपयुक्त पुस्तक ब्रेल लिपीतून प्रकाशित करण्यास सहकार्य केल्याबद्दल महानगरपालिकेचे व शीव रुग्णालयाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad