मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून असे ट्विट मी केले आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिले आहे का हे केंद्रात विचारायला हवे. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते ना. ११ तारखेला पीटिशन सेनेकडे गेले तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले असावे.
राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये प्रचंड वेगाने घडामोडी घडल्या आहेत. सत्तानाट्याच्या या अंकामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्याची शक्यता असतानाच एक वेगळाच ट्विस्ट आला. फडणवीस आले, पण उपमुख्यमंत्रीपदी आणि मुख्यमंत्री पद मिळाले एकनाथ शिंदेंना. याच सगळ्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरेंचीच ! -
शिवसेनेतल्या बंडखोरीबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावा लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असे म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता त्याचे उल्लंघन करण्यात आले. माझ्या मते ते पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये बसत आहे असे वाटते. ११ जुलैला विश्वासदर्शक ठराव होईल असे वाटते. गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्या वेळी वाटते की या सरकार ला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही.
No comments:
Post a Comment