मुंबई - केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावेळी समारोपाच्या भाषणावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी हिरकणी गाव वाचवण्याकरिता २१ कोटींचा निधी मंजूर केला. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असेही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय नवे सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करेल अशीही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येईल.
No comments:
Post a Comment