मुंबई - माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचे काम आपण करू असे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. त्यामुळे आता मविआकडून विरोधी पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जागा घेणार असून येथून पुढे सभागृहात शिंदे सरकार विरुद्ध अजित पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अजित पवारांचे सर्वपक्षीय नेत्यांनी अभिनंदन केले. या अभिनंदन ठरावाला अजित पवार यांनी उत्तर दिले.
मी लोकसभेला देशात नंबर दोनच्या मतांनी निवडून आलो होतो. पहिल्या क्रमांवर रामविलास पासवान निवडून आले होते. मी गॅलरीतून अनेकदा काम पहायचो. शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. इथे आल्यानंतर इतरांकडे पाहून मी शिकलो असे अजित पवारांनी सांगितले.
No comments:
Post a Comment