मुंबई - ५ दिवसात १२ दिवसाचा पाणीसाठा वाढला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2022

मुंबई - ५ दिवसात १२ दिवसाचा पाणीसाठा वाढला


मुंबई – जून महिना कोरडा गेला. पावसाने आता मुंबईला पाणी पुरविणा-या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार एन्ट्री केली आहे. गेल्या ५ दिवसात ३.२ टक्के म्हणजेच ४६,३०४ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे तलावात १२ दिवसाचा पाणीसाठा वाढल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा या सातही तलावांतून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे तलावात पुरेसा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा संपूर्ण जून महिना पावसाविना गेला. त्यामुळे तलावांत पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याचे संकट ओढवले. ही बाब लक्षात घेऊन पालिकेला मुंबईकरांचे १० टक्के पाणी कपात करावे लागले. जून अखेरीला पावसाने दमदार हजेरी लावली. तलावांतही मागील चार – पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस लागतो आहे. २९ जूनला धरणामध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या ५ दिवसात पाऊस पडल्याने १ लाख ९३ हजार ३१० दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या ५ दिवसात ३.२ टक्के म्हणजेच ४६,३०४ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या ५ दिवसात १२ दिवसांच्या पाण्याची वाढ झाली आहे. हा पाणीसाठा पुढील ५० दिवस पुरेल इतका आहे.

२०२२ मध्ये १९३३१० दशलक्ष लिटर – १३.३६ टक्के
२०२१ मध्ये २८५२५७ दशलक्ष लिटर – १९.७१ टक्के
२०२० मध्ये १०९००६ दशलक्ष लिटर – ७.५३ टक्के

धरणातील पाणीसाठा –
मोडक सागर ४७,८४१ – दशलक्ष लिटर
तानसा १,३५,५५८ – दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा १९,९५६ – दशलक्ष लिटर
भातसा १,०३,०३१ – दशलक्ष लिटर
विहार ६,१२० – दशलक्ष लिटर
तुलसी २,८०३ – दशलक्ष लिटर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad