चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2022

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी


मुंबई - मागील काही दिवसांपासून कोसळणा-या पावसात पडझडीच्या घटनांचे सत्र सुरुच राहिले आहे. बुधवारी चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल जवळील नागोबा चौक परिसरातील तीन घरावर दरड कोसळून एकाच घरातील तीन जण जखमी झाले. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. ही घटना सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल जवळच्या परिसरात कसाई वाड्यात मोठा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात झोपटपट्टी वसलेली आहे. येथे यापूर्वी अनेक पावसाळ्यात दरड कोसळून काहींना जीव गमवावा लागला आहे. सातत्याने येथे दरड किंवा दरडीसह मोठा दगड कोसळण्याच्या घटना घडत आल्या आहेत. दोन - तीन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बुधवारी या डोंगरावरील दरडीचा मोठा भाग तीन घरावर कोसळला. यात शुभम सोनवणे (१५), प्रकाश सोनावणे (४०), सुरेखा वीरकर ( २०) असे एकूण तीन जण जखमी झाले. प्रकाश सोनवणे यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाली आहे तर सुरेखा वीरकर यांच्या डोक्याला मार लागला आहे. अग्निशमन दल, पोलीस व पालिका कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. जखमींना शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad