मुंबई - पावसाळ्यात धोकादायक इमारतीत रहिवाशांनी वास्तव्य करू नये इमारती तात्काळ रिकाम्या कराव्यात असे प्रशासनाने आवाहन करूनही काही रहिवाशी अजूनही अशा इमारतीत राहत आहेत. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन अशा इमारती तात्काळ रिकाम्या करून तेथील रहिवाशांना सप्टेंबर अखेरपर्यंत पालिकेच्या तात्पुरत्या निवा-यात स्थलांतरीत करावे असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
पावसापूर्वी मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण करून त्यातील सी- १ कॅटेगिरीतील धोकादायक इमारतींची यादी जाहिर केली जाते. मुसळधार पावसांत अशा इमारती कोसळण्याचा धोका असल्याने इमारती पावसापूर्वी इमारती रिकाम्या करण्याचे प्रशासनाकडून नोटिस देऊन आवाहन केले जाते मात्र अनेक रहिवासी पुनर्वसनाचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने काही रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असूनही रहिवासी तेथेच वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे. निय़मानुसार अशा इमारतीत राहणे धोकादायक असल्याने प्रशासनाकडून तेथील वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याची कारवाईही केली जाते. मात्र काही इमारतीत रहिवासी तीव्र विरोध करीत असल्याने इमारती रिकाम्या केल्या जात नाही. सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याने ज्या धोकादायक इमारती अद्याप रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत, अशा इमारतींची यादी करून कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिका कार्यवाही सुरु करणार आहे. अशा इमारतीतील रहिवाशांना सप्टेंबर अखेरपर्यंत पालिकेच्या तात्पुरत्या निवा-यात व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी होते कार्यवाही -
महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. मुंबई महापालिका कायदा १८८८ अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात.
No comments:
Post a Comment