मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आठवडाभरात गणवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2022

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आठवडाभरात गणवेश



मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांना आता गववेशाची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या आठवडाभरात नव्या रंगसंगतीतला गणवेश विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. तसेच २७ शालेय वस्तुंपैकी रेनकोट व स्टेशनरीचा पुरवठा करण्यात आला असून उर्वरित वस्तुंचा पुरवठाही येत्या काही दिवसांत केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेने याआधी २००९ मध्ये महापालिका शाळांचा गणवेश बदलला होता. पण त्यानंतर गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेने गणवेशात कोणताही बदल केला नव्हता. मुंबई महापालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी होणारी भक्कम तरतूद पाहता शाळांना आकर्षक अशी रंगसंगती दिली जात आहे. त्यानुसारच आता शाळांमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नवीन रंगाचा गणवेश येत्या आठवड्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थांसाठी २००९ मध्ये निश्चित केलेला गणवेश हा निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नवा गणवेश मिळणार आहे. यावेळी क्रीम रंगाची ट्राऊजर आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट अशा रंगसंगतीचा गणवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये काही विशिष्ट डिझाईन गणवेशासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल १३ वर्षांच्या ब्रेकनंतर हा गणवेश विद्यार्थ्यांना नव्या रंगासह वापरता येईल. विद्यार्थ्यांच्या २७ शालेय वस्तुंपैकी हा गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शाळा सुरु होऊनही मागील महिनाभरापासून मुलांची गणवेशासाठी असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad