मुंबई - मागील काही दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. यंदा जोरदार पावसांत मुंबईत पाणी साचून मुंबई ठप्प झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या कामाचे कौतुक होत असताना दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्य़ांमुळे पालिकेला टीकेचे लक्ष्य केले जाते आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी पालिका कामाला लागली आहे. पालिकेचे वरिष्ठ अधिका-यांकडून रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली जाते आहे. खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने उघडीप घेताच मुंबई महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे विविध भागात रस्ते बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. या कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी उपायुक्त (पायाभूत सुविधा ) उल्हास महाले व रस्ते विभागाचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी करत आहेत. रविवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दहिसर आणि बोरीवली येथील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी करून सूचना केल्या.
मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. या पावसांत सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले असले तरी त्याचा निचरा लवकर झाला. मुसळधार पावसातही मुंबई ठप्प झाली नाही. तासनतास पाणी साचून राहणा-या ठिकाणी पाण्याचा लवकर निचरा झाला. त्यामुळे यंदा पालिकेने चांगले काम केल्याचे मुंबईकरांकडून कौतुक झाले. मात्र दुसरीकडे रस्ते खड्डेमय झाल्याने टीका होऊ लागली. त्यामुळे खड्ड्यांमुळे टीकेचे लक्ष्य होऊ नये यासाठी पालिका खड्डे बुजवण्यासाठी कामाला लागली आहे. पावसाने उसंत घेतल्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे.
खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिका आयुक्तांना आपापल्या विभागातील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती जाणून घेताना रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी पावसाने उघडीप घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. ख़ड्डे बुजवण्याच्या कामांचा आढावा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी घेतला. काही ठिकाणी महत्वाच्या सूचना दिल्या.
या रस्त्यांवरील बुजवले खड्डे -
आर- उत्तर विभागात, दहिसर (पूर्व) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर रामकुंवर ठाकूर जंक्शन येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. आर मध्य विभागात, बोरिवली (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर आर. एम. भट्टड जंक्शन आदी रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली. आर दक्षिण विभागात, कांदिवलीलिंक रोड आणि महात्मा गांधी मार्ग जंक्शन येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची तसेच आर दक्षिण विभागात, कांदिवली (पश्चिम) मधील लालजीपाडा जंक्शन येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे सुपूर्द केलेल्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त उल्हास महाले, अशोक मेस्त्री, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर सहायक आयुक्त निवृत्त्ती गोंधळी, उपप्रमुख अभियंता मनोज कामत, उपप्रमुख अभियंता भाग्यवंत लाटे आदी अधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment