मुंबई - कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ व बीए २.७५ चा राज्यात झपाट्याने फैलाव होऊ लागला आहे. रविवारी राज्यात बीए. ४ आणि बी ए. ५ व्हेरिएंटचे ३० रुग्ण, तर बी ए. २.७५ चे १८ रुग्णांची नोंद झाल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि बी. जे. वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बीए. ४ चे २ तर बीए. ५ चे ३० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए. २.७५ व्हेरिएंटचेही १८ रुग्ण आढळले आहेत. यातील २१ रुग्ण पुणे, १३ ठाणे, सांगली -६, रायगड - ४, कोल्हापूर -२ आणि अमरावती, जालना येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या सर्व रुग्णांचा सखोल साथ शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १९२ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.
No comments:
Post a Comment