मुंबई - मागील पाच दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस कोसळत आहे. रविवारी व सोमवारी सकाळपर्यंत काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने दुपारनंतर जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. पावसाने संततधार ठेवल्याने सखल भागात पाणी साचले. रेल्वे वाहतूकही मंदावली. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही जाम झाली. त्यामुळे कामावरून घरी परतणा-या मुंबईकरांचे हाल झाले. येत्या २४ तासांत काही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईत सोमवारी दुपारपर्यंत अधून मधून सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसाने संततधार सुरु ठेवल्याने दादर टीटी, वडाळा, हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी, परळ, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली, मालाड आदी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने कामावरून घराकडे परतणा-या मुंबईकरांना बराचवेळ प्रवासात अडकून पडावे लागले. पावसामुळे रेल्वे वाहतूकही मंदावली. लोकल विलंबाने धावल्याने स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली. अनेकांना गर्दीमुळे काही लोकल सोडाव्या लागल्याने घरी पोहचण्यास उशिर झाला. मुंबई महापालिकेने सखळ भागात पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा उपसा केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. रस्त्यावर पाणी सातचल्याने बेस्ट वाहतूकीवरही काहीसा परिणाम झाला. ट्रॅफिक जाम झाल्याने बेस्टने प्रवास करणा-यांना बराचवेळ अडकून पडावे लागले. दरम्य़ान येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पावसाची नोंद - (सांयकाळी ६ वाजेपर्यंत)
शहर - २१ मिमी
पूर्व उपनगर - १७ मिमी
पश्चिम उपनगर - २५ मिमी
१४ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या-
शहरात २, पूर्व उपनगरांत ५ व पश्चिम उपनगरांत ७ अशा १४ ठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या पडल्या. यात कोणालाही मार लागलेला नाही.
पाच ठिकाणी घरे, घराचा भाग कोसळला
शहरात ३, पूर्व उपनगरांत १ व पश्चिम उपनगरांत १अशा पाच ठिकाणी घरे व घरांच्या भिंती पडल्या तर पाच ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घटना घडल्या या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.
येथे पाणी साचले -
दादर टीटी, वडाळा, हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी, परळ, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मिलन सबवे, वांद्रे, बोरिवली, मालाड आदी.
No comments:
Post a Comment