मुंबई - विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यानंतर भाषणादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी टिंगल करणा-यांचा मी बदला घेणार असा इशारा टिकाकारांना दिला.
शिवसेना भाजप युतीचे आमचे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला, याबाबत मी शिंदे यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. असे म्हणत फडणवीस यांनी सभागृहात आपल्या भाषणाची सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला.
मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो. यांना सोबत घेऊन आलो.
ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असे म्हणत, ‘दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते… कोशिश करने से हर मुश्किल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नही जाते..’ अशा शब्दात फडणवीस यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
No comments:
Post a Comment