बारावी निकालात पुन्हा कोंकण विभागाने मारली बाजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2022

बारावी निकालात पुन्हा कोंकण विभागाने मारली बाजी


मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी - मार्च २०२०च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.

राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. त्यापैकी मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे. ४ मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

विभागवार निकाल खालीलप्रमाणे -
कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी -
पुणे: १७२१
नागपूर: १०४६
मुंबई: २७६६
कोल्हापूर: ५९३
अमरावती: १७८३
नाशिक: ६१२
लातूर: ५६३
कोकण: १३८

बारावीचा निकाल कोठे पाहायचा?
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- https://hsc.mahresults.org.in

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad