राज्यातील शाळा 15 जूनला सुरू होणार -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2022

राज्यातील शाळा 15 जूनला सुरू होणार -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड



मुंबई - राज्यातील शाळा 15 जून (Maharashtra School) रोजी सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad