मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. शुक्रवारी दिवसभरात रुग्णांची संख्या १९५६ वर पोहचली आहे. गुरुवारी १७०२ रुग्णांची नोंद झाली होती. तर ७६३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या शनिवारी रुग्णांची संख्या ८८९ होती.. रविवारी यात आणखी वाढ होऊन रुग्णसंख्या ९६१ पोहचली. सोमवारी ही संख्या काहीशी घटली होती. मात्र मंगळवारी रुग्णांची आकडेवारी १२४२ वर गेली. तर बुधवारी यात मोठी वाढ होत १७६५ वर गेली. शुक्रवारी रुग्णसंख्या दोन हजारच्या जवळपास पोहचली आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. दिवसभरात ७६३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ७७ हजार १९९ झाली आहे. तर दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५७० वर स्थिर राहिली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४८ हजार ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के वर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६४२ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सध्या ९ हजार १९१ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
No comments:
Post a Comment