महापालिका प्रभाग आरक्षणावर २३२ हरकती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2022

महापालिका प्रभाग आरक्षणावर २३२ हरकती



मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीवर सोमवारी शेवटच्या दिवशी २३२ हरकती सूचना प्राप्त झाल्या. यावर सुनावणी होऊन येत्या १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली होती. यावर १ ते ६ जूनपर्यंत हरकती - सूचना मागवण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या दोन दिवसांत अवघ्या तीन हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चार दिवसांत हरकती, सूचनांची संख्या वाढली. सोमवारी शेवटच्या दिवशी २३२ हरकती प्राप्त झाल्या. यावर आता सुनावणी घेतली जाणार असून १३ जूनला राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागात ९ प्रभाग वाढल्याने आता २३६ प्रभाग झाले आहेत. यावर आरक्षण सोडण्यात काढण्यात आली. काँग्रेस व सपाने या सोडतीवर आक्षेप घेत न्य़ायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सूचना, हरकतीच्या माध्यमातून विरोध केला जाईल अशी चर्चा होती. १ ते ६ जून पर्यंत यासाठी कालावधी देण्यात आला होता. सुरुवातीच्या दोन दिवसांत फक्त तीनच हरकती प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत ही संख्या वाढून २३२ वर गेली. दरम्यान हरकती, सूचना योग्य असतील तर त्याची दखल घ्यावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad