मुंबई - शिवसेनेने मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर २४ तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा मग बोलू असा इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिला होता. मात्र संजय राऊत यांची ऑफर शिंदे गटानी धुडकावल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment