लिफ्ट कोसळून ४ मजूर ठार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2022

लिफ्ट कोसळून ४ मजूर ठार



नवी मुंबई - नवी मुंबई तळोजा फेज-२ सिडको गृहनिर्माण योजना कन्स्ट्रक्शन साईटवरील अपघातात शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे ४ मजूर ठार झाले, तर २ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, संपूर्ण घटनेची सिडकोतर्फे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

बांधकाम मटेरियल नेणारी लिफ्ट कोसळल्याने ४ कामगारांचा मृत्यू झाला. लिफ्ट जवळ उभे असलेले दोन कामगार, तर लिफ्ट खाली गाडीत बसलेले दोन कामगार ठार झाले. तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना संध्याकाळी ५ वाजता घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७ लाख, तर गंभीर जखमींच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी. जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले. याचबरोबर जखमींवरील उपचारांचा खर्चदेखील शिर्के यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad