देवेंद्र फडणवीस सरकारचा १ जुलैला शपथविधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2022

देवेंद्र फडणवीस सरकारचा १ जुलैला शपथविधी



मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा १ जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते १ जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या गोटात आनंद साजरा करण्यात आला. ताज हॉटेलवर सर्व आमदार जमले असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी पेडे भरवून जल्लोष केला. उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत. त्यानंतर भाजप सत्तास्थापनेच्या हालचाली करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर १ जुलै रोजी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळतात, काय वाटाघाटी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अडीच वर्षांत राज्याला न्याय द्यायचाय -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. येत्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. पुढच्या सूचना येईपर्यंत सगळ््या आमदारांना मुंबईतच थांबावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad