देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2022

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री


नवी दिल्ली - राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का दिला असून आपण मंत्रीमंडळात सामील होणार नसल्याचे म्हटले होते. आता मात्र पक्षश्रेष्ठीच्या आदेशान्वये देवेन्द्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास फडणवीस यांनी होकार दर्शविला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी सर्वत्र चर्चा होती. आज शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येऊन राज्यपालांची भेट घेतली तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हते की ते मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र, फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्याने सर्वांनाच एक आश्यर्याचा धक्का बसला. तसेच, मी मंत्रीमंडळातही सहभागी होणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी होतील असे जाहीर केले. तसे ट्विट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मात्र त्यानंतरही फडणवीस यांनी आपण पक्षाचे काम करू सारे सांगितले होते. त्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना फोन केल्यावर उपमुख्यमंत्री पद घेण्यास फडणवीस यांनी होकार दर्शविला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad