मुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून दीड हजार ते १९०० पर्यंत स्थिर राहिलेल्या रुग्णसंख्येने बुधवारी दोन हजार पार केले आहे. दिवसभरात २२९३ रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर १७६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात १७१३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी तीन -चार दिवसांत दीड ते १९०० वर स्थिर राहिली होती. सोमवारी रुग्णसंख्येत ब-यापैकी घट झाली. मात्र मंगळवारी रुग्ण पुन्हा वाढून रुग्णसंख्या १७२४ वर गेली. बुधवारी रुग्णसंख्या आणखी वाढून २२९३ वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. मृत्यूचे प्रमाणही रोज शून्य ते दोनपर्यंत स्थिर राहिले आहे. बुधवारी १७६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ८५ हजार ८८२ झाली आहे. तर दिवसभरात एका रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५७६ वर गेली आहे. तर आतापर्यंत १० लाख ५३ हजार ९६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के वर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३८ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सध्या १२ हजार ३४१ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
No comments:
Post a Comment