मुंबई: जोपर्यंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत म्हटले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे गट उद्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. आमच्याकडे ४१ आमदारांचं संख्याबळ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ सह्यांचं पत्र पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढेच नव्हे तर, शिंदेंच्या गोटात अजून काही आमदार सहभागी होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्या घेऊन पत्र पाठवण्यात आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सह्या घेऊन पत्र राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment