मुंबई - लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी असतानाच भाजपचे महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ सुरू झाले आहे. शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या १८ मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. यादृष्टीने लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी भाजपने त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने यासाठी एक आढावा बैठक गुरुवारी आयोजित केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यातील १७ ते १८ जागांवर जास्त लक्ष देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार आहेत. या १६ मतदारसंघांत केंद्रीय मंत्र्यांचे दौरेही होणार आहेत. केंद्राच्या योजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील.
No comments:
Post a Comment