मुंबई - बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट शिंपोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे सी.डी.एस. प्रमुख "जनरल बिपीन रावत उड्डाणपूल" असे नामकरण करा अशी मागणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बोरीवलीतील या उड्डाणपुलामुळे नागरिकांची स्वामी विवेकानंद मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पुलाच्या नामकरणाची मागणी भाजपने केली आहे. सी.डी.एस. प्रमुख "जनरल बिपीन रावत उड्डाणपूल" असे नामकरण करण्याची मागणी भाजपची आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्याने तो खुला केल्यास येणाऱ्या पावसाळ्यात या उड्डाणपुलामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या बोरीवली व कांदिवली विभागातील सर्व नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांची भेट घेतली. या भेटीवेळी पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा व उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथींसोबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे अशी आग्रही मागणी देखील पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment