मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यभरात सक्रिय होणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी गाव तिथे शिवसेना (Shiv Sena) या संकल्पनेवर काम करण्याच्या सुचना सर्वच जिल्हा प्रमुखांना दिल्या. शिवसेनेची कामगिरी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असं काम करा. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहे.
विरोधकांकडून शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर कसे द्यायचे याची तयारी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहे. तसेच औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसंदर्भात आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होऊन अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. हे पाहता उद्धव ठाकरे यांनी आता पासूनच पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना नंबर वन करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीही शिवसेनेने कंबर कसली आहे.
No comments:
Post a Comment