१० पैकी एका महिलेकडून नव-याला मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2022

१० पैकी एका महिलेकडून नव-याला मारहाण


नवी दिल्ली - नॅशनल फॅमेली हेल्थ सर्व्हे ५ च्या आकडेवारीनुसार १८ ते ४९ वयोगटातील १० टक्के महिला अशा आहेत ज्यांनी कधी ना कधी पतीला मारहाण केली आहे. या महिला अशा आहेत ज्यांच्या पतीने कधीच त्यांच्यावर हात उचलला नाही. याचाच अर्थ कोणतेही कारण नसताना १० टक्के महिलांनी पतीला मारहाण केली आहे.

या सर्व्हेत असे देखील समोर आले आहे की, ११ टक्के महिलांनी गेल्या एका वर्षात पतीला मारहाण केली. वाढणा-या वयासोबत पतीला मारहाण करणा-या महिलांची संख्या वाढत आहे. १८ ते १९ वयोगटात १ टक्केपेक्षा कमी महिला मारहाण करतात. तर २० ते २४ वयोगटातील ३ टक्के महिला, २५ ते २९ वयोगटातील ३.४ टक्के महिला, ३० ते ३९ वयोगटातील ३.९ टक्के महिला, ४० ते ४९ टक्के महिला ३.७ टक्के महिलांनी पतीला मारहाण केली आहे.

राजस्थानमधील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये एक महिला स्वत:च्या पतीला बॅटने मारताना दिसते. संबंधित व्हीडीओ अलवरचा असल्याचे समजते. या व्हीडीओतील व्यक्ती अजीत सिंह असून ते सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. अजित सिंह यांच्या घरातील सीसीटीव्हीचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. यात पत्नी त्यांना बॅटने मारत असल्याचे दिसते. अजीत सिंह यांची ९ वर्षापूर्वी सोनीपत येथील सुमन यांच्याशी विवाह झाला होता.

लग्नानंतर काही दिवस चांगले गेले. पण त्यानंतर नाते बिघडू लागले. पत्नीकडून वारंवार त्यांना मारहाण केली जाऊ लागली. घरगुती हिंसाचार म्हटले की आधी महिला समोर येतात. पण अजित सिंहसारखे अनेक पुरुष देखील घरगुती हिंसाचाराला सामोरे जात असतात.

शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाण
धक्कादायक म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिला अधिक मारहाण करतात. पतीला मारहाण करण्याचे शहरातील प्रमाण ३.३ टक्के आहे तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ३.७ टक्के आहे.

पुरूषांसाठी कायदा नाही
महिलांना मारहाण झाली तर त्यांच्यासाठी कायदा आहे. पण पुरुषांसाठी असा कोणताही कायदा नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने एका निर्णयात याचा उल्लेख केला होता.

काय करू शकतात पुरुष -
हिंदू विवाह कायदा १३ नुसार घटस्फोट मागू शकतो. या कलमानुसार अर्ज करणारी व्यक्ती दुस-या व्यक्तीवर क्रुरता आणि शारीरिक किंवा मानसिक हिंसाचाराच्या विरोधात अर्ज करू शकते. या शिवाय भारतीय दंडविधान संहिता कलम १२० बी, कलम १९१, कलम ५०६ आणि सीआरपीसी कलम २२७ नुसार कायदेशीर कारवाई करू शकतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad