मुंबई - मुंबईत सध्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार कायम राहिला आहे. रविवारी मुंबईत कोरोनाचे १५१ नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी कोरोनाचे १५५ नवीन रुग्ण आढळले होते. शनिवारी ही संख्या घसरून १३१ वर आली होती. रुग्णसंख्येत चढउतार होत असला तरी रुग्णांची आकडेवारी २०० च्या आत स्थिर राहिली आहे.
मुंबईत मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी वाढ होताना दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी रुग्णसंख्या १७२ वर पोहचली होती. त्यानंतर ही रुग्णसंख्या ७० च्या जवळपास स्थिर राहिली. मात्र शुक्रवारी पुन्हा रुग्णसंख्येने दीडशे पार केली. रविवारी १५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात १२२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ६१४ झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४१ हजार १६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात एका मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत मृतांची संख्या १९,५६६ वर स्थिर राहिली आहे. सध्या एकूण ८८५ सक्रीय रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्केवर गेला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५८५५ दिवसांवर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
No comments:
Post a Comment