मुंबई - मुंबईत मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सव्वा तीनशे ते साडे तीनशे पर्यंत असलेल्या रुग्णसंख्येत मंगळवारी वाढून ५०६ वर पोहचली आहे. सोमवारी ३१८ रुग्णांची नोंद झाली होती. दिवसभरात २१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात सोमवारी १५० रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या आधी ही रुग्णसंख्या स्थिर होती. मात्र मागील पाच - सहा दिवसांपासून रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसते आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ६५ हजार ८०२ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६६ वर स्थिर आहे. तर दिवसभरात २१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २३५५ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या २६१५ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
No comments:
Post a Comment