मुंबई महानगरपालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2022

मुंबई महानगरपालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत


मुंबई  - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेने जाहीर केला आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३१ मे रोजी वॉर्डच्या आरक्षणाशी संबंधित लॉटरी काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार येत्या मंगळवारी, ३१ मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी प्रक्रियेवर सूचना आणि हरकती मांडण्यासाठी, ६ जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
                
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ओबीसी आरक्षणाशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडणार आहे. त्यानुसार निवडणुक प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यालाययाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने वाढलेल्या ९ प्रभागावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता २२७ वॉर्डवरून २३६ वॉर्ड झाले निश्चित झाले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात मंगळवारी, ३१ मे रोजी पार पडेल. कोणालाही सूचना आणि हरकती असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच मुंबईतील २४ प्रभागांमध्ये नोंदवण्याची सुविधा उपलबब्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडेल.

महिलांसाठी किती प्रभाग?
ओबीसी आरक्षणाचे ६१ प्रभाग हे खुले प्रभाग होणार आहेत. त्यामुळे २३६ पैकी ११८ प्रभाग हे महिलांसाठी असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित ठेवले जाणार आहेत. त्या पैकी ८ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहे.तर अनुसूचित जमाती साठी २ प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे. तसेच २१९ प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत त्या पैकी १०९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या आरक्षण सोडतीवर  १ ते ६ जून पर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील  व १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदानाला ऑक्टोबर उजाडणार -
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मतदार यादी तयार करण्यात येणार येईल. यादीवरही मतदारांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसणे, पत्ता बदली झाल्यास तो सुधारून घेणे, वयाशी संबंधित तक्रारी, अशा प्रकारच्या तक्रारींचे निरसन करणे आदी प्रक्रियाही पार पडतील. त्यानंतर मतदार यादी प्रभाग निहाय व बूथ निहाय फोड करणे यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे निवडणूक पूर्व तयारीसाठी अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागू शकतो. सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन ४५ दिवसांची आदर्श आचारसंहिता लागू होईल व ऑक्टोबरमध्ये निवडणूक पार पडणे अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad