Bmc Elections - मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2022

Bmc Elections - मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर



मुंबई- आगामी मुंबई महापालिकेच्या सन २०२२ च्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वॉर्डच्या आरक्षणाशी संबंधित सोडत काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ओबीसी आरक्षण वगळून सोडत काढण्यात आली. आयुक्त इकबाल चहल, निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत नवीन प्रभाग रचनेनुसार २३६ प्रभागातून महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ११८ प्रभाग, अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. पुरुष-खुला वर्गासाठी ११८ जागा जाहीर झाल्या आहेत. हरकती सूचनांसाठी १ ते ६ जून पर्यंत कालावधी असणार आहे. १३ जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभाग आरक्षण -
प्रभाग सोडतीवर पालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. सोडतीनंतर काही दिग्गजांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवता येणार नाही. २००७, २०१२, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जे प्रभाग आरक्षित होते ते खुले करण्यात आले आहेत. तर गेल्या दोन ते तीन निवडणुकीत जे प्रभाग आरक्षित झाले नव्हते ते प्रभाग अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर जे प्रभाग गेल्या तीन निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित झाले नव्हते त्याला प्राधान्य क्रमांक १ नुसार ५३ प्रभाग व २ नुसार महिला ३३ प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर जे प्रभाग मागील २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित नव्हते अशा ६३ प्रभागातून प्राधान्य क्रमांक ३ नुसार २३ प्रभागासाठी सोडत काढण्यात आली.

इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला -
२३६ पैकी ११८ महिला प्रभाग झाले असून उर्वरित ११८ प्रभागात पुरुष उमेदवारांना निवडणुकीसाठी संधी आहे. त्यामुळे, पालिकेच्या इतिहासात गेल्या काही वर्षांची पूर्वपिठीका पाहिल्यास प्रथमच पहिल्यांदा महिला आणि पुरुष उमेदवारांना समान संधी प्राप्त झाली आहे. महिलांसाठी आरक्षित ११८ प्रभागात अनुसूचित जाती महिलांसाठी आठ, अनुसूचित जमाती महिलांसाठी एक अशा ९ प्रभागांची सोडत काढण्यात आली. कोणते प्रभाग आरक्षित तर कोणते प्रभाग खुले हे स्पष्ट झाल्याने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागण्यास मोकळे झाले आहेत. तर अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. मात्र प्रभागावर वर्चस्व कायम राहावे यासाठी घरातील महिला किंवा पुरुष उमेदवाराला निवडणुकीसाठी उभे करण्याची शक्यता आहे.

२३ महिला प्रभागांसाठी सोडत -
जे प्रभाग गेल्या तीन निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित झाले नव्हते त्याला प्राधान्य क्रमांक १ नुसार ५३ प्रभाग व २ नुसार महिला ३३ प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर जे प्रभाग मागील २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित नव्हते अशा ६३ प्रभागातून प्राधान्य क्रमांक ३ नुसार २३ प्रभागासाठी सोडत काढण्यात आली.

२३६ प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे
अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक -
६०,८५,१०७,११९,१३९,२५३,१५७,१६२,१६५,१९०,१९४,२०४,२०८,२१५, २२१ असे १५ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती महिला प्रभाग आरक्षित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यात, अनुसूचित महिलासाठी १३९, १९०, १९४, १६५, ८५, १०७, ११९, २०४ या प्रभागांसाठी सोडत काढण्यात आली.

सोडतीचे सूत्र -
२०१७ च्या निवणुकीत मुंबई पालिकेचे २२७ प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने ९ प्रभागांची वाढ केल्याने हे संख्या २३६ प्रभागांवर गेली. ही प्रभाग रचना मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने ओबीसी वगळता निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुरुवातीस अनुसूचित जाती १५, अनुसुचित जमातीचे दोन प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यामधून अनुसूचित जातीच्या आठ आणि अनुसूचित जमातीच्या एक महिला प्रभागासाठी सोडत झाली. त्यासह, उर्वरित प्रभागांमधून १०९ महिला प्रभाग आरक्षित करताना यापूर्वी आरक्षित न झालेल्या प्रभागाचा प्राधान्य क्रम सूत्र ठरविण्यात आले. त्यानुसार, ८६ प्रभाग आरक्षित केले असून २३ प्रभागासाठी सोडत काढण्यात आली.

- महिलांसाठी २३६ पैकी ५० टक्के (११८ प्रभाग ) आरक्षण जाहीर.
- अनुसूचित जातीसाठी १५ जागा
- अनुसूचित जमातीसाठी २ जागा जाहीर
- पुरुष व खुला वर्ग ११८ जागा जाहीर

असे असणार २३६ प्रभागांचे आरक्षण -
सर्वसाधारण ११० प्रभाग वॉर्ड - १, ३, ४, ६, ७, ८, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९ , २०, २४, २६, २७ ,३०, ३१, ३२, ३५, ३६, ३७, ३८, ४०, ४१, ४२, ४३, ४७, ४८, ५१, ५६, ५८, ६२, ६३, ६५, ६६, ६८, ७०, ७१, ७२, ७३, ७६, ७७, ७८, ८२, ८३, ८४, ८७ , ८९, ९१, ९३, ९४, ९७, १०१, १०५, १०८, ११०, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, १२३, १२६, १२७, १२८, १२९, १३२,१३३, १३५,१३६, १३८, १४०, १४१, १४३, १४९,१५२,१५८, १६१, १६४, १६६, १६७, १७३, १७४, १७६, १७९, १८०, १८३, १९३, १९५, १९७, १९८, १९९, २००, २०३, २०६, २०९, २१०, २११, २१४, २१६, २१९, २२२, २२३, २२४, २२८, २३५

सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित १०९ वॉर्ड - २, ५, ९, १०, ११, २१, २२, २३, २५, २८, २९, ३३, ३४, ३९, ४४, ४५, ४६, ४९, ५०, ५२, ५३, ५४, ५७, ५९, ६१, ६४, ६७, ६९, ७४, ७५, ७९, ८०, ८१, ८६, ८८, ९०, ९२, ९५, ९६, ९८, ९९, १००, १०२, १०३, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२०, १२१, १२२, १२५, १३०, १३१, १३४, १३७, १४२, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १५०, १५१, १५४, १५५, १५६, १५९, १६०, १६३,१६८, १६९, १७०, १७१,१७२, १७५, १७७, १७८,१८१, १८२, १८४,१८५, १८६, १८७, १८८, १८९, १९१, १९२, १९६, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१७, २१८, २२०, २२५, २२६, २२७, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३६

ओबीसीच्या ६१ जागा खुल्या प्रवर्गात -
- महापालिकेच्या निवडणुका ‘ओबीसी’ आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत २०१७ च्या निवडणुकीत ‘ओबीसी’साठी राखीव असलेल्या ६१ जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad