मुंबई - "प्रतिभा चयन मैदान में, चमकायेंगे हिंदुस्तान में" हे ब्रीदवाक्य घेऊन रविवारी सायंकाळी मुंबईतील घाटकोपर येथील माणिकलाल मैदानावर ‘खासदार खेळ महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला, खासदार मनोज कोटक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ईशान्य मुंबईतील पहिल्या मोठ्या खेळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, भाजप आमदार राम कदम, क्रिकेटपटू प्रवीण तांबे, भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी खासदार मनोज कोटक म्हणाले की, "ईशान्य मुंबईतील "खासदार खेळ महोत्सव" या भव्य महोत्सवात लोक सक्रियपणे सहभागी होत आहेत याचा मला आनंद आहे. या क्रीडा स्पर्धेत झोपडपट्टीपासून इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकामध्ये दडलेल्या कलागुणांना शोधून त्यांना शक्य ती मदत करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील."आपल्याला तंदुरुस्त राहण्याची किती गरज आहे हे आपण कोरोनामधून शिकलो आहोत, अशा क्रीडा स्पर्धा लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील.
बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, कबड्डी क्रिकेट यासह 25 प्रकारचे वैविध्यपूर्ण खेळ विविध 100 ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत, या खेळात 1 लाखांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत, हे उल्लेखनीय आहे की, कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर संपूर्ण मुंबईतील हा आतापर्यंतचा सर्वात भव्य कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment