मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल यांचा केंद्रिय सचिव पदावर जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या यादीत समावेश झाला आहे. यामुळे चहल यांचा केंद्रात सचिव पदावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईला कोरोना मुक्त करण्यात चहल यांचा मुख्य वाटा आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे असे चहल यांनी म्हटले आहे.
चहल यांच्या कामाची दखल -
जगामध्ये हाहाकार पसरवणारा कोरोना मुंबईत मार्च २०२० मध्ये पसरला. त्यावेळी मुंबईत मे २०२० मध्ये इकबाल सिंग चहल यांची पालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. चहल यांनी मुंबई मॉडेल, धारावी मॉडेल, चेस द व्हायरस, डॉक्टर आपल्या दारी, टेस्टिंग टेस्टिंग ट्रॅकिंग ट्रीटमेंट आदी संकल्पना राबवून कोरोनाचा प्रसार रोखला आहे. याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.
महत्त्वाचा टप्पा -
केंद्र सरकारच्या कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीने ज्येष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमधील अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यात इकबाल सिंग चहल यांचा समावेश आहे. चहल हे २०२७ मध्ये निवृत्त होणार असून त्या आधी ते केव्हाही केंद्राच्या सेवेत जाऊ शकतात. सध्या तरी आपण पालिकेच्या सेवेत असणार असल्याचे चहल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment