मुंबई - मुंबईत सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे. शनिवारी दिवसभरात ३३० नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी दिवसभरात ३५२ रुग्ण आढळले होते. गेल्या सोमवारी १५० रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी ही संख्या पुन्हा वाढून २१८ वर गेली. त्यानंतर आता ही आकडेवारी साडेतीनशेवर पोहचवली आहे. दिवसभरात १९८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत १५० च्या आत स्थिर राहिलेली कोरोना रुग्णसंख्या मागील तीन - चार दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्यात नव्या बी ४ या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ६४ हजार ६०३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६६ वर स्थिर आहे. तर दिवसभरात १९८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १ लाख ४३ हजार १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३१३८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या १,९२९ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
No comments:
Post a Comment