पेट्रोल डिझेलच्या किंमती नाममात्र कमी करण्याचा देखावा नको - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2022

पेट्रोल डिझेलच्या किंमती नाममात्र कमी करण्याचा देखावा नको - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई दि. २१ - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. यावर पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे तरच नागरिकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad