मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भुयारी मार्गात अनधिकृत फेरीवाल्यांचा धुमाकूळ सुरु आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पालिकेचे मुख्य कार्यालय असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल विचारला जातो आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात ये- जा करताना अनेकजण भुयारी मार्गाचा वापर करतात. यावेळी फेरीवाले आपले व्यवसाय आडवे - तिडवे थाटत असल्याचे चित्र आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी या भुयारातून जाताना मुंबईकर- प्रवाशांना कसरत काढून मार्ग काढावा लागतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून दररोज हजारो प्रवाशी येथील भुयारी मार्गातून बाहेर पडतात. कामाला जाता येताना मोठी वर्दळ प्रवाशांची असते. याचवेळी भुयारी मार्गात असलेल्या दुकानांसमोर अनेक फेरीवाले दुकाने थाटून बसत आहेत. साहित्य विकण्यासाठी या विक्रेत्यांची बोंबाबोंब सुरू असते. खेळण्यांचा कर्कश आवाज याचा प्रवाशाना कमालीचा त्रास होत असतो. मात्र मुजोर फेरीवाल्यांविरुद्ध कोणत्याही प्रवाशांची त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचे धाडस होत नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. पालिकेचे मुख्य कार्यालय हाकेच्या अंतरावर असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जातो आहे.
कारवाईचा दिखावा -
भुयारी मार्गातील या अनधिकृत फेरीवाल्यांवर क्वचित कारवाई होते. कारवाई होणार याची खबर देणारे त्यांचे खबरी आहेत. कारवाई होणार याची कुणकुण लागताच फेरीवाले आपले साहित्य तेथील दुकानातच लपवतात. त्यामुळे कारवाई हा फक्त दिखावा ठरत असल्याचे दिसून येते.

No comments:
Post a Comment