“जर एखाद्याला एंडोमेट्रिओसिस असेल तर आपल्याला अनेक लक्षणे दिसतात. मासिक पाळीत वेदना, सहा महिन्यांहून अधिक काळ ओटीपोटात वेदना, अनियमित रक्तप्रवाह, सूज, दीर्घकाळ थकवा या लक्षणांचा त्यात समावेश होतो. एंडोमेट्रिओसिस विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला हा आजार झाला आहे की नाही हे शोधणे खूप कठीण जाते.एंडोमेट्रिओसिसचे निदान करणे फार कठीण आहे. संशोधन असे सुचवते की एंडोमेट्रिओसिस शोधण्यासाठी सुमारे सात ते बारा वर्षे लागतात.”, असं अभ्यासक सांगतात.
मासिक पाळी आणि अनियमित मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदनांसह जास्त रक्तस्त्राव होणे, लघवी करताना वेदना, नेहमी थकल्यासारखे वाटणे, मासिक पाळी दरम्यान ओटीपोटाच्या भागात तीव्र वेदना ही या आजाराची लक्षणं आहेत. एंडोमेट्रिओसिस असलेल्या प्रौढ महिलांना सेक्स दरम्यान वेदना, गर्भधारणा न होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागतं. एंडोमेट्रिओसिसच्या निदान लक्षणांचं निदान आधारे लेप्रोस्कोपीद्वारे केलं जातं.
मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना आणि अनेक रोग देखील असू शकतात. फायब्रॉइड्स, पेल्विक इन्फ्लामॅट्रॉय डिसीज किंवा एडेनोमायोसिस सारखे रोग कारण असू शकतात. फायब्रॉइड्समध्ये, गर्भाशयाचा आकार वाढू लागतो. मात्र, त्यातून कर्करोग होण्याची शक्यता नगण्य आहे. हा आजार बहुतेक 30-50 वयोगटातील महिलांमध्ये होतो आणि त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतात. हा आजार 16 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींमध्येही दिसून येतो.
मासिक पाळीच्या काळात महिलांना त्रास जाणवतो, हे नैसर्गिक आहे. पण हा त्रास जास्त जाणवत असेल, पुन्हा-पुन्हा घडते तेव्हा त्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकते.
No comments:
Post a Comment