मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील अत्यंत महत्त्वाची जागा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आठ महिन्यांच्या चित्रीकरणासाठी ५ एकर जमीन ८ महिन्याकरिता भाड्याने दिली आहे. समितीच्या शिफारशीनंतर कुलगुरु यांनी भाडयात ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. तसेच संपूर्ण ८ महिने पार्किग सेवाही मोफत असेल अशी माहिती आरटीआय कार्येकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहिती अधिकारातून समोर आली आहे.
मुंबई विद्यापीठाकडे चित्रीकरणासाठी मेसर्स सिद्धेश एंटरप्राइजेसला दिलेल्या ५ एकर जागेबाबत विविध माहिती विचारण्यात आली होती. गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या कागदपत्रांच्या माहितीतून यापूर्वी याच जागेसाठी शासनाकडून ५० हजार भाडे प्रति दिनी मुंबई विद्यापीठाने घेतले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर समिती गठित करण्याचे अधिकार कुलगुरु यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. समिती गठन करण्यापूर्वी १ ते २ लाख किंवा अधिकची रक्कम प्रतिदिनी भाडे आकारण्याबाबत प्रस्ताव होता. त्रिसदस्यीय समितीने प्रति एकर पहिल्या महिन्याला ३ लाख आणि दुसऱ्या महिन्यापासून ४ लाख असे भाडे निश्चित करण्यात आले. व्हॅनिटी व्हॅन व जनरेटर व्हॅनसाठी प्रतिदिन पाच हजार पार्किंग शुल्क निश्चित करण्यात आले. याविरोधात मेसर्स सिद्धेश एंटरप्राइजेस तर्फे १५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाने २ दिवसांत म्हणजे १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मार्गदर्शनाबाबत उप कुलसचिव तर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला. कुलगुरु यांनी पार्किंग शुल्क न आकारण्याचे आदेश दिले तसेच पहिल्या महिन्यासाठी प्रति एकर १ लाख व दुसऱ्या महिन्यापासून २ लाख रुपये असा बदल केला. यामुळे सरळसरळ ८० लाखांचे नुकसान भाड्यात आणि पार्किंग शुल्काचे १२ लाखांचे नुकसान झालेले दिसत असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment