मुंबई - आज राज्यात अनेकांना ऍसिडिटी झालीय. त्यांना मुंबईत झालेली कामे दाखवा. त्यांनी आपल्या सत्ता असलेल्या राज्यात किती ठिकाणी अशी दर्जेदार कामे केली तइ दाखवून द्यावे असे खुले आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकाना दिले. बिन कामाच्या भोंग्यांना मी काडीची किंमत देत नाही, दादागिरी केली तर ती मोडून काढू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकाना दिला आहे.
हाच फरक आमच्या आणि राष्ट्रपती राजवटीत -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भारतामधील पहिल्या एनसीएमसी (वन नेशन वन कार्ड) कार्डचा लोकार्पण कार्यक्रम बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयात झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अनिल परब, आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबईकरांसाठी आम्ही दर्जेदार काम करत आहोत. खासगी प्रमाणे पालिका शाळांचा दर्जा झाला आहे. लोक खासगीमधून पालिका शाळांकडे वळत आहेत. बेस्टच्या बसचा, बस स्टॉपचा दर्जा सुधारत आहे. बस स्टॉपची दखल केंद्र सरकारने घेतली आहे असे आमचे काम सुरू आहे. हाच फरक आमच्या आणि राष्ट्रपती राजवटीत आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.
हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का -
आम्हाला हिंदुत्व सोडल बोलल जात, हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का सोडलं बोलायला असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला आहे. बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. कोर्टाने राम मंदिर बांधायला दिले आहे. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधारी लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. हनुमान चालीसा बोलायला आमच्या घरात यायचे आहे, तुमची संस्कृती असेल तर या घरात. पण घरात येताना नीट या. दादागिरी करून घरात याल तर ती दादागिरी मोडून काढू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकाना दिला. नव हिंदूत्व आले आहे ते 'तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे असे बोलत आहेत त्या सर्वाना उत्तर देण्यासाठी लवकरच एक सभा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कायदा सुव्यवस्था का बिघडवता -
मुंबई आणि राज्यात चांगले काम केले जात आहे. पण ते काही लोकांना हे बघवत नाही. रमजान चालू आहे. हनुमान जयंती, आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. मात्र काही लोकांना मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा बोलायचा आहे. तुमच घर नाही का, कायदा सुव्यवस्था का बिघडवता असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच मराठी पण टिकल पाहिजे, बाहेरच्यांनी यावे राहावे खावे पण वातावरण बिघडवू नये, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा पवार यांनी दिला आहे. मुंबईचा विकास हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे. सर्व जातीच्या लोकांना पुढे घेऊन जाताना मुंबईचे मुंबईपण विसरता कामा नये. बंधुता कायम ठेवायची आहे. सुरक्षित शहर हा विश्वास टिकवायचा आहे असे पवार यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment