नवी मुंबई - काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना ( Navi Mumbai Police ) यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
राज्य महिला आयोगाकडे संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात अर्जही दिला होता. पोलिसांना दिलेल्या पत्रात महिलेने आमदार गणेश नाईक यांच्यासोबत ती 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले होते. त्यांच्यापासून तिला मुलगा झाला असल्याचेही तिने म्हटले होते. गणेश नाईक हे आठवड्यातून दोन ते तीन दिवस संबंधित महिलेसोबत राहत होते. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना नाईक हे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. तेव्हा संबंधित महिलेला गणेश नाईक यांच्यापासून मुलगा झाला असल्याचेही महिलेने अर्जात म्हटले होते. संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्यापासून तीला झालेला मुलगा पंधरा वर्षाचा झाला आहे. मुलाच्या शिक्षणाचा व भविष्याची तरतूद म्हणून उपाययोजना करा, असे गणेश नाईक यांना ती महिला वारंवार सांगत होती. मात्र, नाईक हे आज करू उद्या करू असे सांगून टाळाटाळ करत होते. शिवाय मी काही बोलले की नाईक मला व माझ्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत असत त्यामुळे माझ्या मुलाला न्याय देणे गरजेचे आहे, अशी तक्रार महिलेने केली आहे.
No comments:
Post a Comment