शिवसेना आमदाराने उभारले तृतीयपंथीयांसाठी शौचालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2022

शिवसेना आमदाराने उभारले तृतीयपंथीयांसाठी शौचालय


मुंबई - मुंबईत महिला आणि पुरुष अशीच शौचालये आहेत. यामुळे कोणत्या शौचालयात जायचा असा प्रश्न तृतीयपंथीयांसमोर होता. यामुळे त्यांची कुचंबणा होत होती. त्यामुळे त्यांच्यासाठीही शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी होती. याची दखल घेत गोरेगाव पूर्वेकडील आरे नाका येथे महापालिकेच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर शौचालय उभारण्यात आले आहे. (Toilet for transgender)

मुंबईत तृतीयपंथीय लोकांसाठी शौचालय असावे अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती. मात्र यासाठी कोणच पुढाकार घेत नव्हते. पालिका आणि राज्य सरकारकडूनही यासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांना तृतीयपंथीच्या बाबत माहिती देत याबाबत पत्र दिले. या पत्रानंतर तृतीयपंथीची मागणी मान्य करून शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात शौचालयाचे काम आमदार फंडातून करून बांधण्यात आले. गोरेगाव चेकनाका याठिकाणी अनेक तृतीयपंथी सिग्नलवर उभे असतात. तसेच अनेक तृतीय पंथी या विभागात राहण्यासाठी असल्यामुळे अशा तृतीयपंथी नागरिकांना याचा लाभ होईल. तृतीयपंथीयासाठी मुंबईतील हे पहिले शौचालय आहे.

मुंबईत शौचालये उभारा -
मुंबईत जागोजागी, रेल्वे स्थानक, उद्यान, रस्त्यावर, वस्त्यांमध्ये शौचालय आहेत. ही सर्व शौचालये पुरुष आणि स्त्रियांसाठी आहेत. यामुळे तृतीयपंथीयांना शौचालयात जाताना त्रासदायक ठरत होते. या कारणाने तृतीयपंथीयांसाठी वेगळे शौचालय उभारावे अशी मागणी करण्यात येत होती. गोरेगाव प्रमाणेच मुंबईत इतरही ठिकाणी अशी शौचालये उभारावीत अशी मागणी तृतीयपंथीयांची आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad