सुजात आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांनी म्हटलं की मुस्लिमानी भोंगे लावले तर मी पोरांना भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणायला लावेल. माझा ठाकरे यांच्या वक्तव्याला 100 टक्के पाठींबा आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की, अमित ठाकरेंना तिकडे हनुमान चालीसा म्हणायला पाठवा. मला एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. जितकी पोरं हनुमान चालीसा म्हणायला जाणार आहेत त्यांनी शर्ट काढून जानवं दाखवा, एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. तसेच, ठाकरेंना विनंती आहे की तूम्ही शरद पवार यांचा इंटरव्ह्यू घ्या. तुमचा संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदु मुस्लिम दंगलीवर उभा करु नका. तसेच, महाराष्ट्र पोलिसांना माझं आव्हान आहे की. तुमच्या सर्वांच्या समोर काल वक्तव्य केलं आहे. त्यामूळे तुम्हाला माहिती आहे की कुणाला पकडायचं आहे, असा जोरदार हल्लाबोल सुजात यांनी राज यांच्यावर केला आहे.
सुजात यांनी यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, त्याठिकणी कार शेड बांधण्याचे नियोजन शिवसेनेचे होते. याशिवाय कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या मुलांवरील गुन्हे मागे घेऊ असेही आदित्य ठाकरे म्हटले होते. मात्र, अद्यापही तसे झाले नाही. या मुलांवरील गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना परदेशात शिक्षणासाठी पासपोर्ट मिळत नाही, असे सुनावले. तर वंचित बहुजन आघाडी ही भाजपचे बी टीम असल्याच्या आरोपावर सुजात यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे. ज्यांनी आमच्यावर 'बी टीम'चा आरोप केला, ते सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांबरोबर गेले, असा टोलाही सुजात यांनी लगावला.
बऱ्याच दिवसानंतर आज मी बोलत आहे. आपली ताकद काल होती तशीच आजही आहे. आपली ताकद कमी होणार नाही. मागच्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणं गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीही लाटेवर पंतप्रधान झाले आहेत. मागच्या दोन निवडणुका लढताना लक्षात आलं की आपण स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे आता आपण आपला समाज सोडून इतर समाजच्या लोकांनाही आपल्या पक्षाशी जोडायचं आहे, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
No comments:
Post a Comment