मुंबई दि.14 - विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या संस्कृतीला समतेची संजीवनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे आठवले यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, पुत्र जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सचिन मोहिते, नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना, महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हेच आमचे लक्ष असून त्यासाठी संपूर्ण देशात आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून रिपब्लिकन पक्ष मजबूत करीत आहोत. डॉ. आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन गट तट विसर्जीत करून रिपब्लिकन ऐक्य साकार केले पाहिजे. इतर लोक रिपब्लिकन सोडून अन्य पक्ष चालवीत आहेत. पण ज्यांना डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवायचा आहे त्यांनी आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष चालवावा. त्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक असल्याचे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment