मुंबई - मोबाईल, टॅबलेट, संगणक व इतर गॅजेट्समुळे आभासी विश्वात हरवत चाललेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी मुंबईतील पालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत प्रत्येकी एक प्रमाणे २४ उद्यानांत मोफत वाचनालयाची सुरुवात सामाजिक दायित्वातून करण्यात येत आहे. मुंबईतील उद्याने सुशोभित आणि विविध सुविधांनी सुसज्ज केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांची पावले उद्यानांकडे वळावीत, यासाठी विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
याबाबत माहिती देताना पूर्व उपनगराच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले की, मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा देताना सामाजिक दायित्व (CSR FUND) तत्त्वातून अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने देखील अलीकडच्या काळात सामाजिक दायित्वातून अनेक अभिनव उपक्रम पूर्ण केले आहेत. प्रामुख्याने उद्यानांच्या रुपाने मुंबईच्या सुशोभिकरणास हातभार लावण्यात आला आहे. विविध चौक, वाहतूक बेटं व रस्ते दुभाजक यांचे सुशोभिकरण, मियावाकी पद्धतीने केलेली साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड अशा उपक्रमांचाही त्यात समावेश आहे. कोविड विषाणू संसर्ग स्थितीत नियंत्रणात आल्यानंतर उद्यानांकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे विरंगुळा आणि व्यायामाच्या सेवा-सुविधांपलीकडे जाऊन संगीतमय सकाळ, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (NCPA) यांच्या सहकार्याने आयोजित संगीतमय संध्या असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती व संस्था अशा प्रकारच्या उपक्रमांकरिता स्वारस्य दाखवित असतात. काही संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी मुंबईतील उद्यांनामध्ये सामाजिक दायित्व तत्त्वावर मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्वारस्य दाखविले आहे. या संस्था पुस्तके, ग्रंथ आणि इतर वाचन साहित्य विनामूल्य उपलब्ध करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भिडे यांनी नमूद केले आहे.
उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क अशा प्रकारच्या महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर बांधलेली वास्तू (Built up Structure), गजेबो (Gazebo) उपलब्ध आहेत. अशा उद्याने आणि जागांमध्ये योग्य अशा ठिकाणी छोटेखानी कपाट ठेऊन त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, ग्रंथ ठेवण्यात येत आहेत. उद्यानास भेट देणाऱया नागरिकांना सदर वाचन साहित्य मोफतपणे वाचणे शक्य होईल. वाचन झाल्यानंतर सदर साहित्य उद्यानांमधील कपाटांमध्येच परत ठेवले जाईल. आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्यक्ष वाचन साहित्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, संगणक इत्यादी उपकरणांच्या (Screen Devices) आभासी विश्वात युवा पिढी हरवत चालली आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना तणावमुक्त होता यावे, त्यासोबतच त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हा यामागील उद्देश आहे. लुप्त होत चाललेल्या वाचनालय संस्कृतीस संजीवनी प्राप्त करून देण्याकरीता हा उपक्रम योगदान देऊ शकेल. प्रत्येक विभागातील एक उद्यान अशा प्रकारे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

No comments:
Post a Comment