मुंबई - अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, राठोडांचा राजीनामा घेतला तर मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? दाऊदच्या इशाऱ्यावर सरकार चालते का हा आमचा सवाल आहे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तरी संघर्ष करणारच. हा मोर्चा तर सुरुवात आहे. संघर्ष देशद्रोह्यांशी व्यवहार करणाऱ्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत संघर्ष राहणार आहे. आम्ही षडयंत्र उघड केले. मुद्दाही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे होता है, अशा शब्दांत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, आमचे संबंध गुन्हेगारांशी नाहीत. तेव्हा षडयंत्र केले तरी हे षडयंत्र उघडे पाडू. अनेक बॉम्ब आम्ही ठेवलेत त्या त्या वेळी ते येतील. ते बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनीनो संघर्ष सुरू झाला आहे. मोर्चा निघेल तेव्हा पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. मोर्चा अडवला तरी अटक केली तर अटक करा. आम्हाला अटक केली तर गडबड करू नका. बारावीची परीक्षा आहे, परीक्षार्थींना आंदोलनाने त्रास होता कामा नये. जे निर्देश देतील त्याप्रमाणे काम करायचे आहे. राजीनामा दिला नाही तर हा संघर्ष तीव्र होईल. संघर्ष झाकी है पिक्चर अभी बाकी है. बिकने का तो सवालही नही उठता, हम शिवाजी महाराज के मावळे है, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला.
बॉम्बस्फोटाचा आरोपी सरदार शहावली खानने याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला. केवळ कट केला नाही, बॉम्ब कसा बनवायचा याचे प्रशिक्षण घेतले. केवळ प्रशिक्षण घेतले नाही, तर तो बॉम्ब स्कूटरमध्ये ठेवला. त्या ठिकाणी स्कूटर नेऊन ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याचे काम सरदार शहावली खानने केले. जो आजही जेलमध्ये आहे. दुहेरी जन्मठेप झाली आहे, त्या ठिकाणी त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. हसिना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण आहे, जिच्या नावाने दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात रिअल इस्टेटचा धंदा चालवतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. धंदा चालवून याच ठिकाणी पैसा जमा करून त्याच पैशाच्या माध्यमातून आणि आयएसआयच्या मदतीने या मुंबईत बॉम्बस्फोट घडवत होता. त्या हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचले. तिची जमीन कब्जामध्ये घेतली. एलबीएस रोडवरची तीन एकराची जमीन, जमिनीचा भाव कोट्यवधी रुपये, त्या वेळेचा सरकारी भावदेखील दोन हजार रुपये चौरस फूट आणि यांनी खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली. ही जमीन सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चरला विकली. सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर कोणाचा आहे. नवाब मलिक यांचे सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर, त्याने कोणाकडून जमीन घेतली. जो व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट करून हजारो लोकांना मारून जेलमध्ये आहे. अशा जेलमधल्या व्यक्तीकडून नवाब मलिक यांनी जमीन विकत घेतली. या ठिकाणी २५ रुपये चौरस फुटाने तीन एकर जागा नवाब मलिकांनी विकत घेतली, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत एखादा शौचास बसला तरी त्या जागेची किंमत ही २५ स्क्वेअर फूटपेक्षा जास्त आहे. विक्री पत्रावर पहिला फोटो सरदार शहावली खानचा आहे. दुसरा फोटो दाऊदच्या सलीम पटेलचा आहे. तिसरा फोटो नवाब मलिकाच्या मुलाचा आहे. तिघेही त्याच्यावर सह्या करत आहेत. शहावली खान आणि सलीम पटेलकडून खोट्या प्रकारचे कागदपत्र तयार करून हा सगळा खोटेपणा केला. एवढ्यावरच ही कहाणी थांबत नाही, ज्यावेळी ईडीने याचे इन्व्हेस्टिगेशन केले. या कटाच्या मागची सूत्रधार दाऊदची बहीण हसिना पारकर होती. तो सर्व पैसा हसिना पारकरला नेऊन दिला. हा सर्व पैसा हसिना पारकरने कशाकरीता वापरला. मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. अशाच पैशातून मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून टेरर फंडिंग केले गेले. टेरर फंडिंगमध्ये मदत करणारा महाराष्ट्राचा एक मंत्री होता, असेही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केले.
दाऊद कनेक्शन असणाऱ्या मलिकांना मुख्यमंत्री वाचवताहेत - प्रवीण दरेकर
महात्मा गांधी यांनी अहिंसेचा पुरस्कार केला. त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर संपूर्ण सरकार देशद्रोहीला पाठीशी घालण्यासाठी बसतात. उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत बसतात. आमचे महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाऊद कनेक्शन असणाऱ्या नवाब मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेबांचा ठाकरी बाणा कुठे गेला? असा सवालही दरेकर यांनी केला. तसेच देशद्रोहीला वाचवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहेत. परंतु राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे विधान प्रवीण दरेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment