मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊनही त्यांच्या मंत्री पदाचा सरकारकडून राजीनामा घेतला जात नसल्याने भाजप आक्रमक झाला आहे. मलिकांचा राजीनामाच्या मागणीसाठी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मुंबईत विराट मोर्चा काढून सरकारविरोधात हल्लाबोल केला. आझाद मैदानातू काढण्यात आलेला हा विराट मोर्चा मेट्रो सिनेमागृहाच्या चौकात पोलिसांना रोखला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मलिकांचा राजीनामा घ्या महाराष्ट्र वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
नवाब मलिकांना विविध आरोपाखाली अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान भाजपच्य़ा आमदारांकडून विधान भवनाच्या पाय-यांवर बसून मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले जाते आहे. मात्र नवाब मलिकांना अटक होऊनही त्यांचा राजीनामा घेतला जात नसल्य़ाने बुधवारी मोठ्या संख्येने आझाद मैदानात मोर्चा काढण्य़ात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच मुंबईतील आझाद मैदानात भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, खासदार गोपाळ शेट्टी आदी दिग्गज नेते मोर्चात सहभागी झाले होते. आझाद मैदानात झालेल्या सभेत सर्वच नेत्यांनी नवाब मलिकांवर जोरदार आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. नवाब मलिकांचा राजीनामा घ्या महाराष्ट्र वाचवा अशा विविध घोषणांनी आझाद मैदातील परिसर दणाणून गेला. मोर्च्यात सर्व भाजपचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्य़ासह सर्वच नेत्यांनी सरकारवर घणाघात केला. ही सुरुवात आहे, यापुढे आणखी आक्रमक भूमिका घेतली जाईल. मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही असा इशाराही भाजपच्या नेत्यांनी दिला.
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा मोर्चा -
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंतचे अंतर कमी असल्यामुळे मोर्चा काही वेळातच पोहोचला होता. मोर्चा मेट्रो सिनेमापर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी भाजपच्या नेत्यांना ताब्यात घेतले. फडणवीसांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमापाशी ठिय्या मांडला. पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस जेथे पोलिस अडवतील तेथे थांबण्याचे फडणवीस यांनी आवाहन केल्याने मोर्चेकरांनी मेट्रो येथे ठिय्या मांडला.
No comments:
Post a Comment