बीजिंग : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपले आणखी एक औद्योगिक शहर लॉकडाऊन करण्याची वेळ चीनवर आली आहे. सोमवारी रात्री लियओनिंग प्रांतातील ९० लाख लोकसंख्या असलेल्या शेनयांग शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
चिनी सरकारने जाहीर केलेल्या झिरो कोव्हिड धोरणाला ओमिक्रॉनच्या नव्या लाटेने आव्हान दिले आहे. चीनमध्ये गेल्या मंगळवारी एकाच दिवशी ४७७० कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते. यातील बहुतेक रुग्ण उत्तर-पूर्व जिलीन प्रांतात आढळून आले. आता याच भागाच्या शेजारील लियओनिंग प्रांतातील शेनयांग शहरही लॉकडाऊन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment