मुंबई - कांदिवली पश्चिम के. डी. कंपाऊंड, लालजी पाडा, सिम्पोली टावरच्या मागे ड्रेनेज लेनचे काम सुरु असताना तळ अधिक एक मजली घराचा भाग आज सायंकाळी ४ वाजता कोसळला. या दुर्घटनेत चार वर्षीय नौशाद अली याचा मृत्यू झाला असून अन्य पाच जखमीना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कांदिवली येथील डी. कंपाऊंड, लालजी पाडा, सिम्पोली टावरच्या मागे ड्रेनेज लेनचे काम सुरु आहे.
ड्रेनेज लेनचे काम सुरु असताना आज शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास तळ अधिक एक मजली घराचा भाग कोसळला. या घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे स्थानिक रहिवाशांनी मुंबई अग्निशमन दलाला सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. नौशाद अली (४), हसीना शेख ( २२), प्रेमा यादव ( ३८), मोहम्मद अन्सार ( १६), दिलशाद शहा (३ वर्षे), शाहिदुनिसा रेन (३०) या सहा जणांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात रुग्णालयात दाखल केले असता नौशाद अली या ४ वर्षीय मुलाचा रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment