मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार, असे वाटत असतानाच विधिमंडळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषणास सुरुवात केली. त्याचवेळी घोषणाबाजीला सुरुवात झाल्याने राज्यपालांनी अवघ्या एका मिनिटात आपले भाषण आटोपले. त्यानंतर ते विधीमंडळातून बाहेर पडले. (Governor stopped the speech in one minute)
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच अत्यंत वादळी झाली. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असताना विधीमंडळात घोषणाबाजीला सुरुवात झाली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणाबाजी केली. तर विरोधी भाजपच्या नेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या राज्यपालांनी अवघ्या एका मिनिटात भाषण पटलावून ठेवून सभागृहातून काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment